Sunday, 19 February 2017

कागदही गच्च भरला होता ...प्रत्येक बारकावा टिपला जात होता...प्रत्येक भाव साठवून शब्दही थकलेले ...शब्दांची जुळवाजुळव थांबली होती...आणि आता उरली होती ती फक्त कविता ...माझी पहिली वहीली कविता ...कविता कसली हो काहीसं गद्यचं जणू ते

शब्दांची ओंजळही रिती
 झाली तुला वर्णिताना
तुझ्या आठवणींत
तुझ्याचसाठी झुरताना

अजूनही लागे उत्कंठा
तुला जाणण्याची
तु नसतानादेखील तुझ्या
आठवणींत गुंतण्याची

कधीतरी मागे वळून पाहशील
ही निरागस आशा
पण कधीच उमजली नाही का
तुला माझ्या प्रतीक्षेची भाषा?

विसरुनि गेले मी
स्वतःच्या अस्तित्वाला
तुझ्या विरहापायी
तुझ्यासाठी जगताना

स्वाभिमानाची चौकटही ओलांडली
तुला जाणताना
अन् स्वतःलाच हरवले
तुला शोधताना

विचारांच्या मैफिलीतही
सदैव तुलाच गुंफिले
पण तू मात्र सारे
हसण्यावारी नेले

आता सरले ते दिवस
विरला तो भूतकाळ
मग पुन्हा त्या आठवणींपायी
मी का डावलू वर्तमान? 

No comments:

Post a Comment